News Details
महारेन संकेतस्थळाचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
जीमाकाच्या ई-वृत्त सेवेचा उद्या शुभारंभ- Published in (Pudhari) - 8 September 2010
ई-चावडीमुळे महसुली कामकाजात एकसूत्रता - जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख - Published in (Mahanews) - 15 Oct 2010
कोल्हापूर जिल्ह्यात सात बारा उतारा शेतकर्यांना सहजा सहजी व तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी इ-चावडी ही योजना राबविण्यात येत असून यामुळे प्रशासकीय कामकाजाला गती प्राप्त झाली आहे. तसेच शेतकर्यांच्याही वेळेत आणि श्रमात बचत झाली असल्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी महान्यूजशी बोलताना सांगितले.
प्रश्न :- जिल्ह्यात ई-चावडीद्वारे संगणकावर सात/बारा उतारे देण्यास सुरुवात झाली आहे यामागचे प्रयोजन काय आहे?
उत्तर :- सात-बारा हा शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपल्या वडिलोपार्जित जमिनीची माहिती मिळावी, त्यातील त्रुटींची पूर्तता करता यावी, व्यवहार करतानाचे सोपस्कार करताना सुलभता यावी. यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतो. शेतकर्यांची ही धावपळ कमी होऊन व्यवहारात सुलभता यावी केवळ या एकाच हेतुने कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत शेतकर्यांना त्वरित सात/बारा मिळावा या हेतुने जिल्ह्यात ई-चावडीद्वारे संगणकावर सात/बारा उतारे देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ३७० हून अधिक तलाठी गावकर्यांना जागेवरच सात/बारा उतारा मागताक्षणीच देतील
प्रश्न :- या योजनेचे नियोजन कशाप्रकारे करण्यात आले आहे?
उत्तर कोल्हापूर जिल्ह्यात १२१७ गावे आणि १०२६ ग्रामपंचायती आहेत. साधारणपणे एका तलाठय़ाकडे ४ ते ५ गावांचे क्षेत्र येते. राज्य शासनाने संगणकावर सात/बारा देण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. ही घोषणा कोल्हापूर जिल्ह्यात आता प्रत्यक्षात येत आहे. ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी तांत्रिक बाजू पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीमुळे या योजनेस मूर्त स्वरुप आणण्यास विलंब झाला.
योजनेत सहभागी झालेल्या तलाठय़ांनी स्व:खर्चाने लॅपटॉप खरेदी केले आहेत. राज्य शासनाने त्यांना नाममात्र दराने कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. जवळजवळ ३७० तलाठय़ांनी लॅपटॉप आणि प्रिंटर खरेदी केले आहेत. जिल्ह्यात एकूण ४२० तलाठी आपली सेवा देत आहेत. उर्वरित तलाठीही टप्प्याटप्प्याने लॅपटॉप व प्रिंटर खरेदी करणार आहेत.
प्रश्न :- ई-चावडी योजनेत सहभागी झालेल्या तलाठय़ांना कशाप्रकारे प्रशिक्षण देण्यात आले आहे ?
उत्तर :- या ई-चावडी योजनेत सहभागी झालेल्या तलाठय़ांना आवश्यक ते प्रशिक्षण त्याचप्रमाणे त्या त्या गावच्या सात/बार्यांची माहिती असलेला डाटा त्यांच्या लॅपटॉपमध्ये भरुन (फीड) देण्यात आला आहे.
सात/बारा हाताने लिहून दिला जातो. तलाठी कार्यालय आणि सेतू केंद्रावर सात/बारा उतारा दिला जातो. सेतू केंद्रावरील सात/बार्यावर तलाठय़ाची सही नसते, त्यामुळे न्यायालयाच्या, बँकेच्या कामासाठी तो ग्राह्य धरला जात नाही. शिवाय उतारा काढण्यासाठी वेळही लागतो. हा होणारा सर्व विलंब आता ई-चावडीमुळे टळला असून वेळेची आणि आर्थिक बचत शिवाय मानसिक त्रास यापासून शेतकर्यांची सुटका झाली आहे.
आता ई-चावडीवर देण्यात येणार्या सात/बारा उतार्यावर तलाठय़ाची सहीही शेतकर्यांना मिळत आहे. त्यामुळे शासकीय कामासाठी हा उतारा ग्राह्य ठरत आहे. हाताने लिहिलेल्या उतार्यासाठी साधारणत: दहा रुपयांचा आकार घेतला जातो. लॅपटॉपवरील उतार्याला पंधरा रुपये आकार ठेवला आहे. लॅपटॉपच्या प्रिंटरची सोय असल्यामुळे तलाठी शेतकर्यांना मागताक्षणी उतारा देऊ शकतो. भविष्यात हे तलाठय़ांचे लॅपटॉप तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सेतू केंद्रांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे आपल्या गावचा उतारा तुम्ही शहरातही मागू शकता. यासाठी खास करुन तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकताही भासणार नाही.
या ई-चावडीमुळे महसुली कामकाजात एकसूत्रता आली असून तलाठी, तहसिलदार कार्यालयातील गर्दीही हळूहळू कमी होत असून प्रशासकीय कामकाजाला यामुळे गती प्राप्त झाली आहे.
News Details
महारेन संकेतस्थळाचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
जीमाकाच्या ई-वृत्त सेवेचा उद्या शुभारंभ- Published in (Pudhari) - 8 September 2010
Jhajjar Banks on tracking devices
to check sex determination
'Active tracker' to check foeticide in Jhajjar
अब एक्टिव ट्रैकर बचाएगा बेटी - पानिपत ( दैनिक भास्कर)